एखादा अर्थसंकल्प फार चांगला असू शकत नाही, पण तो विशिष्ट दिशेनं जातोय, हे तरी दिसलं पाहिजे!
नेत्यांकडून एक महत्त्वाची अपेक्षा असते. ती म्हणजे येऊ घातलेल्या आव्हानांसाठी जनतेची तयारी करणं. दुर्दैवानं, राजकीय बदलांचे संकेत जसे चटकन् दिसून येतात, तसं आर्थिकबाबतीत होताना दिसत नाही. वस्तू व सेवा कराला झालेला जोरदार विरोध आणि त्यामध्ये केलेले सतराशे साठ बदल, हे या कमी पडलेल्या संवादाचं द्योतक आहे. एखादा अर्थसंकल्प फार चांगला असू शकत नाही, हे एक वेळ मानता येईल, पण तो विशिष्ट दिशेनं जातोय हे तरी दिसलं पाहिजे.......